नागपूर : राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान आज विधानसभा सभागृहात गुंठेवारी कायद्यातील जाचक अटी दूर करा, अशी मागणी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी केली आहे. यासोबत त्यांनी अनेक प्रश्नांकडे लक्ष केंद्रित केले.
प्रवीण दटके यांनी केलेल्या मागण्या –
1. गुंठेवारी कायद्याअंतर्गत नागपुरातील अंदाजे 1.50 लाख प्लॉट धारकांनी नियमितिकरणासाठी अर्ज केला आहे, परंतु 2 वर्ष पूर्ण होऊनही अद्याप रिलीज लेटर दिले नाही.
2. प्लॉट लीज आऊट करताना चुकीच्या पद्धतीने आगाऊ शुल्क आकारले जात आहे.
3. हुडकेश्वर सारख्या भागात NMC कडून नियमितीकरण सुरू असताना NIT कडून शुल्क घेतले जात आहे.
4. NIT ला NMRDA मध्ये विलीन करून NIT बरखास्त करावी.
दरम्यान प्रवीण दटके यांना या मागण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक समिती गठित करून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.