Published On : Mon, Aug 31st, 2020

वर्षाकाठी लालपरीच्या २० हजार टायरचे नवीनीकरण

-२४ तासांत १०८ टायर रिमोल्डची क्षमता, वर्षाकाठी १२ कोटींची बचत, शासकीय आणि निमशासकीय कामाची परवानगी

MSRTC, ST Bus

नागपुर – लालपरीच्या चाकाचे आयुष्य संपल्यानंतर त्याचे काय होते, असा प्रश्न सामान्यांना पडण्याचे काहीच कारण नाही आणि पडलाच तर ते चाक (टायर) पुन्हा उपयोगात येणार नाही. या पलीकडे दुसरा विचारही डोक्यात येऊ शकत नाही. मात्र तंत्रज्ञान, दूरदृष्टी, कल्पकता आणि यांत्रिक कार्याचा वापर करून कालबाह्य (घासलेल्या) टायरचे नवीनीकरण करून त्याचा उपयोग पुन्हा लालपरीसाठी केला जातो. वर्षाकाठी २० हजार ४०९ टायरचे नवीनीकरण केले असून यापासून १२ कोटींची बचत केली जाते.

Gold Rate
Thursday 06 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

परिवहन महामंडळ आर्थिक संकटात आहे, अशी नेहमीच ओरड असते. मात्र येथील विभागीय कार्यशाळेतील महसूल वाढविणारी कामे आणि वर्षाकाठी कोट्यवधींची बचत करण्याची कामे होताना पाहून परिवहन महामंडळ आर्थिक संकटात राहू शकत नाही, असे यावरून दिसून येते. या विभागाचे अनुकरण केल्यास विभागीय परिवहन महामंडळ आर्थिक संपन्न होऊ शकते.

खिशाला परवडणारा आणि आनंदाचा प्रवास म्हणून लालपरीला प्राधान्य दिले जाते. विभागात ५०० च्यावर बसेस आहेत. विशिष्ट कालावधीनंतर बसच्या टायरचे आयुष्य संपते. मागच्या टायरचे आयुष्य संपल्यानंतर त्याठिकाणी समोरचे टायर लावले जातात. आणि मागचे टायर रिमोल्ड केले जातात. इमामवाड्यात विभागीय कार्यशाळा आहे. या कार्यशाळेत टायर रिमोल्डसाठी विशिष्ट विभाग तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी दोन चेंबर आहेत. याशिवाय रबर चढविणारे यंत्र, स्प्रेडर आणि कॉम्प्रेशर मशिन आहेत. चोवीस तासात १०८ टायर रिमोल्ड तयार करण्याची क्षमता आहे. एका टायरला ४ हजार तर दिवसाकाठी ४ लाख ३२ हजार रुपयांची बचत करण्याची क्षमता आहे. २०१९ ते एप्रिल २०२० पर्यंत २० हजार ४०९ टायरचे नवीनीकरण करण्यात आले आहे. अर्थात महिन्याला १२०० टायर यापासून जवळपास वर्षाकाठी १२ कोटींची बचत केली आहे, ही गौरवाची बाब आहे.

नवीन टायरचे ७० हजार किमीपर्यंत आयुष्य असते, तर रिमोल्ड केलेल्या टायरचे ५० हजार किमीपर्यंत आयुष्य राहील, अशाच पद्धतीने तयार केले जातात. रिमोल्ड केलेले टायर नागपूरसह चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा आणि वर्धा या ठिकाणी पाठविले जातात. महाराष्ट्रात अशा प्रकारचे ९ युनिट तर विदर्भात नागपूर आणि अमरावती येथे दोन युनिट आहेत.

खाजगी वाहनांचे टायरही रिमोल्ड
विभागीय कार्यशाळेत आतापर्यंत परिवहन महामंडळातील बसच्या टायरचेच नवीनीकरण केले जायचे. आता नव्यानेच खाजगी वाहनांच्या टायरचे रिमोल्ड करण्याचे काम घेतले जात आहे. १७ ऑगस्टपासून काम हाती घेतले असून दहा दिवसात चार टायर रिमोल्ड केले आहेत. यापुढे शासकीय आणि निमशाकीय कार्यालयातील वाहनांचे टायर रिमोल्डिंगचे कामे मिळण्याची शक्यता आहे. त्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत, असे उपअधीक्षक (धाव) ज्योती उके यांनी सांगितले.

वर्धमाननगरात प्रस्तावित पंप
राज्य परिवहन महामंडळात २५२ डिझेल पंप आहेत. या सर्व पंपांवर महामंडळाच्या बसेसलाच परवानगी आहे. नव्या आदेशानुसार बाहेरील वाहनांना सुद्धा डिझेल भरण्याची परवानगी असेल. त्यामुळे महसूल वाढण्यास मदत होईल. याशिवाय ३० पेट्रोलपंप नव्याने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागपुरातील वर्धमाननगरात पंप प्रस्तावित आहे.

टायरच्या चुरायालाही किमत नवीनीकरण करताना रबरचा बारीक चुरा मोठ्या प्रमाणात निघतो. त्याचाही ई लिलाव केला जातो. इतरांच्या दृष्टीने हे भंगार आणि टाकाऊ असले तरी रबर बनविणाèया कंपन्यांकडून या चुèयाला मोठी मागणी असते. त्यापासून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.

Advertisement