Advertisement
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाल्याची माहिती आहे. महाजनी यांचा मृतदेह शुक्रवारी तळेगाव दाभाडे येथील सदनिकेत आढळला.
माहितीनुसार, महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते. दोन -तीन दिवसांपासून सदनिकेतून वास येत होता. या बाबतची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली. तळेगाव पोलिसांनी धाव घेतली. सदनिकेचा दरवाजा तोडण्यात आला. महाजनी यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता.
महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर मुंबईत राहायला आहे. गश्मिरला पोलिसांनी ही माहिती दिली असून, ते तळेगाव दाभाडे येथे रवाना झाले आहेत.शविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.