नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. नागपूर खंडपीठाचे प्रबंधक प्रशासन संजय भारुका यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
उच्च न्यायालय प्रशासनातील अधिकारी प्रबंधक न्यायिक अमित जोशी, उपप्रबंधक योगेश रहांगडाले, उपप्रबंधक चंद्रपाल बलवानी, उपप्रबंधक अकबर हुसेन, फैजल कश्मिरी, विलास पुंडलिक, गौरी व्यंकटरमण, उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, पी. एस. चौहान, शरद भट्टड, एन. एस. देशपांडे, अमोल जलतारे, गोपाल सवाई, वरिष्ठ अधिकारी-कर्मचारीवृंद उपस्थित होते.