नागपूर : कत्तलीसाठी निर्दयपणे गोवंश डांबून ठेवणाऱ्या आरोपीविरुद्ध जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ७ गोवंशाच्या जनावरांची सुटका केली आहे.
माहितीनुसार, जुनी कामठी पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान कमसरी बाजारच्या मोकळ्या मैदानात झाडी झुडपात लपून बसलेल्या एका इसमाच्या हालचालीवर संशय आला.
हा इसम पोलिसांना पाहून पळून गेला. पोलिसांनी याठिकाणी पाहणी केली असताना ७ गोवंशीय जनावरे निर्दयतेने बांधून ठेवल्याचे दिसून आले.या जनावरासंदर्भात आजूबाजूच्या लोकांना पोलिसांनी विचारपूस केली असता ही जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्याचे त्यांना माहिती मिळाली.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्या ७ गोवंशीय जनावरांची किंमत एकूण ७० हजार असून त्यांचीही सुटका करून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे.