Published On : Tue, Apr 3rd, 2018

कुंभारे, चव्हण, गेडाम यांना आरक्षणाचा फटका

Advertisement


नागपूर: जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत बहुतांश मतदारसंघाचे आरक्षण बदलल्याने विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, समाज कल्याण सभापती दीपक गेडाम अडचणीत आले आहेत. त्यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत. आजूबाजूला लढण्याची सोय राहिली नसल्याने त्यांना पाच वर्षे आराम करावा लागणार आहे. आरक्षणाच्या फेऱ्यातून जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर बचावले आहेत. सोडतीचा 58 पैकी तब्बल 30 विद्यामान सदस्यांना फटका बसला आहे.

मंगलवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात मंगळवारी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी कादंबरी बलकवडे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका चिमुकलीच्या हस्ते आरणाची सोडत काढण्यात आली. सोडतीमुळे नाराज झालेल्यांनी न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधीच वर्षभर लांबलेली निवडणूक पुन्हा लांबण्याची शक्‍यता आहे.

कळमेश्‍वर
कळमेश्‍वर तालुक्‍यात तेलकामठी, धापेवाडा व नवा गौंडखैरी मतदार संघात प्रस्तापितांना जागा शोधणेही कठीण झाले आहे. विरोधी पक्ष नेते मनोहर कुंभारे यांचा तेलकामठी अनुसूचित जमाती महिला, माजी जि.प. अध्यक्ष रमेश मानकर यांचा धापेवाडा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी तर नवा गौंडखैरी मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. यामुळे तिघांचीही गोची झाली आहे.

Advertisement
Wenesday Rate
Wed 25 Dec. 2024
Gold 24 KT 76,300/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नरखेड
नरखेड तालुक्‍यातील चारही मतदार संघाचे आरक्षण बदलले आहे. शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांचा बेलोना मतदार संघ अनुसूचित जाती महिला, सावरगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, जलालखेडा अनुसूचित जाती, भिष्णूर मतदार संघ इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे विद्यमान सदस्य पुन्हा तालुक्‍यातील कोणत्याही मतदास संघातून लढू शकणार नाहीत.

काटोल
काटोल तालुक्‍यातील चारही जि.प. मतदार संघाचे आरक्षण बदलले आहे. राष्ट्रावादी कॉंग्रेसचे चंद्रशेखर चिखले यांचा मेटपांजरा व कोंढाळी मतदारसंघ खुल्या प्रवर्गातून महिलांसाठी राखीव झाला. येनवा, पारडसिंगा मतदार संघ ओबीसींसाठी राखीव झालेत.

सावनेर
सावनेर तालुक्‍यातील सर्व मतदार संघाचे आरक्षण बदलले आहे. जिल्हा परिषदेचे विद्यमान समाज कल्याण सभापती दीपक गेडाम यांचा चिचोली मतदारसंघाचे आरक्षण बदलल्याने त्यांना दुसरा मतदार संघ शोधवा लागणार आहे.

मौदा
जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांचा मौदा तालुक्‍यातील धानला चिरव्हा मतदार संघ सर्वसाधारण प्रवर्गात आला आहे. यामुळे त्या पुन्हा निवडणूक लढू शकतात. नंदा लोहबरे यांचा तारसा चाचेर खुल्या प्रवागात गेला आहे. त्यामुळे त्यांना अडचण नाही. खात निमखेडा एससी महिला तर अरोली कोदामेंढी ओबीसींसाठी खुला झाला आहे.

कामठी
महादुरा-कोराडी नाना कंभाले यांचा महिलांसाठी राखीव झाला. गुमथळा ओबीसी, वडोदा ओबीसी महिला, येरखेडा मतदारसंघ खुला झाला आहे.

हिंगणा
वानाडोंगरी नगर परिषद झाल्याने माजी जि.प. अध्यक्ष संध्या गोतमारे यांना नवी जागा शोधावी लागणार आहे. रायपूर खुला झाला असल्याने माजी सदस्य बाबा आष्टनकर यांना दिलासा मिळला आहे. नीलडोह सर्वसाधारण, डिगडोह ओबीसी महिला, डीगडोह-इसासनी ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. सातगाव एसटी महिला, खडकी खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला आहे.

उमरेड
मकरधोकडा सर्वसाधारण, वायगाव सर्वसाधारण महिला, बेला सर्वसाधारण महिला, सिरसी एससीसाठी राखीव आहे.

कुही
राजोला ओबीसी, वेलतूर सर्वसाधारण महिला, सिल्ली सर्वसाधरण महिला, मांढळ सर्वसाधरण महिलेसाठी राखीव झाला आहे. मांढळमुळे उपासराव भुते अडचणीत आले आहे.

भिवापूर
तालुक्‍यात फक्त दोनच मतदारसंघ असून कारगाव एसटी, नांद एससी दोन्ही राखीव झाले आहे. कारगावच्या दीपाली इंगोल यांना आरक्षणाच फटका बसला असून नंदा नारनवरे यांना सोयीचे झाले आहे.

रामटेक
रामटेक तालुक्‍यात पथरई कडंबा सर्वसाधारण, बोथिया-पालोरा-उमरी ओबीसी आणि कांद्री-सोनेघाट सर्वसाधरण महिला, मनसर- शीतलवाडी सर्वसाधारण, नगरधन -भंडारबोडी सर्वांसाठी खुला झाला आहे.

पारशिवनी
माहुली सर्वसाधरण, करंभाड ओबीसी महिला, गोंडेगाव खुला, टेकाडी एससीसी महिलांसाठी आरक्षित आहे. टेकाडीचे शिव यादव यांना आरक्षणामुळे दुसरा मतदार संघ शोधावा लागणार आहे.

नागपूर ग्रामीण
गोधनी-रेल्वे ओबीसी महिला, दवलामेटी सर्वसाधरण, सोनेगाव निपानी एससी महिला, खरबी एससी, बेसा एससी महिला, बोरी ओबीसी, बोरखडी सर्वसाधरण महिलांसाठी राखीव झाले आहे. सोनेगाव निपानीमुळे विद्यमान सदस्य संध्या गावंडे अडचणीत आल्या आहेत. खरबीच्या शुभांगी गायधनी यांनाही पाच वर्षे आराम करावा लागणार आहे.

Advertisement