Published On : Thu, Aug 2nd, 2018

मराठा समाजाला कायद्याच्या पातळीवर टिकेल असे आरक्षण देण्यास कटिबद्ध : मुख्यमंत्री

Advertisement

राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असून कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देऊ, अशी ग्वाही गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृहात मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित मान्यवरांच्या बैठकीतील चर्चेनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर कुठल्याही आंदोलनादरम्यान हिंसा करु नये तसेच आत्महत्येचे पाऊल कोणीही उचलू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मराठा आरक्षणासंदर्भात महत्वपूर्ण चर्चेसाठी राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्यवरांनी राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात अनेक महत्वपूर्ण सूचना केल्या. यामध्ये कायद्याबाबतच्या काही तृटींवरही चर्चा झाली. यावरही विचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजासाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचीही माहिती या बैठकीत मान्यवरांना देण्यात आली. त्यावर झालेल्या चर्चेनुसार, समाजासाठी कमी कालावधीच्या आणि दीर्घ कालावधीच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच प्रत्यक्ष कायद्यासंदर्भातील कायदेशीर कार्यवाही आम्ही वेगाने पूर्ण करीत आहोत. त्यानंतर कायद्याच्या पातळीवर टिकेल असे आरक्षण निश्चित वेळेत देऊ. मात्र, याकाळात कोणीही हिंसा करु नये तसेच आत्महत्येसारखी पावले उचलू नयेत.

Advertisement
Advertisement