Published On : Fri, Mar 24th, 2017

इनफ इज इनफ…. मुख्यमंत्री डॉक्टरांवर संतापले


मुंबई:
‘इनफ इज इनफ’. डॉक्टरांच्या मागण्यासाठी सरकार सकारात्मक असतानाही रुग्णांना वेठीस धरणाऱ्या डॉक्टरांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संताप व्यक्त केला आहे. सुरक्षेची हमी आणि इतर सगळ्या मागण्या मान्य करायला सरकार तयार असतानाही रुग्णांना वाऱ्यावर सोडणार तर माफी नसेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

विधानसभेत मुख्यमंत्री आक्रमक पावित्र्यात पाहायला मिळाले. ते म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही, तात्काळ कामावर दाखल व्हा. डॉक्टर म्हणून घेतलेली शपथ आठवा. आता रुग्णांना मरण्यासाठी सोडता येणार नाही. सरकार हातावर हात ठेवून बसणार नाही.

काय आहे प्रकरण ??
राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी मारहाणीच्या निषेधार्थ बेमुदत रजा आंदोलन सुरू केल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत.

त्याची गंभीर दखल घेऊन, उच्च न्यायालयाने गुरुवारी डॉक्टरांना कामावर तातडीने रुजू होण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही डॉक्टरांनी माघार घेतलेली नाही.

हायकोर्टचे डॉक्टरांच्या सुरक्षेच्या संदर्भात लेखी निर्देश दिले व त्याची अंमलबजावणी शिवाय रुजू न होण्याच्या भुमिकेवर डॉक्टर ठाम आहेत.

Advertisement