नागपूर: राज्याच्या उपराजधानीत झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड संघाच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळविला.
शुभम गिलची ८७ धावांची खेळी, श्रेयस अय्यरची वादळी आणि महत्त्वपूर्ण फटकेबाजी, अक्षर पटेलचे अर्धशतक अन् भारताच्या गोलंदाजांची भेदक गोलंदाजी यासह भारतीय संघाने इंग्लंड संघाला धूळ चारली आहे.
इंग्लंडवरील ५ विकेट्सने मिळवलेल्या विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी चांगल्या तयारीत असल्याचे दाखवून दिले आहे.नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला इंग्लंड २४८ धावा करत ४७.४ षटकांत सर्वबाद झाला.
तर भारताने ३८.४ षटकांत इंग्लंडवर ५ विकेट्सने विजय नोंदवला.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी टीम इंडिया दीर्घ कालावधीनंतर एकदिवसीय क्रिकेट खेळत होती. पण भारताने या सामन्यात चांगली कामगिरी करत टीम इंडिया तयारीत असल्याचे दाखवून दिले आहे.