नागपूर : संत रविदास जयंतीनिमित्त बुधवारी (ता.१२) नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील संत रविदास यांच्या तैलचित्राला मनपा अतिरिक्त आयुक्त श्री.अजय चारठाणकर यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी सहा.आयुक्त श्री श्याम कापसे, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी तसेच चर्मकार सेवा संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे, पंजाबराव सोनेकर, प्रा.डॉ. अशोकराव थोटे, महादेवराव मालखेडे, किशोर नांदरे , भाऊराव तांडेकर, विजय चवरे, रमेश सटवे, मनोज बिंझाडे आदी उपस्थित होते.