कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येनाऱ्या गुमथळा गावाजवळ मौदा हुन नागपूर कडे विना परवाना विना रॉयल्टी अवैधरित्या ट्रक क्र एम 40 बी एल 7863 ने 4 ब्रास वाळू वाहून नेत असता गस्ती वर असलेल्या महसूल प्रशासनाच्या पथकाने वेळीच सदर ट्रक वर धाड घालण्यात यश गाठत आरोपी ट्रक चालक इम्रान बघेल ला ताब्यात घेऊन पुढील कारवाहिस्त्व सदर ट्रक मौदा पोलीस स्टेशन ला लावण्यात आले.या कारवाहितुन अवैध 4 ब्रास वाळू जप्त केल्याची यशस्वी कारवाही गतरात्री साडे 12 दरम्यान केली.
ही यशस्वी कारवाही तहसिलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार अमर हांडा, तलाठी एन बी कोहळे, पोलीस कर्मचारी प्रकाश भोतकर, एन डी फुलझेले, पी पी अगत तसेच वाहनचालक युवराज चौधरी यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.