कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या विनालीलावित सोनेगाव वाळू घाटावर तहसिलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने यशस्वीरित्या धाड घालून वाळू घाटातून अवैध वाळू उत्खनन करून ट्रक मध्ये वाळु भरत असलेले 2 ट्रक व वाळू घाटाच्या कडेला वाळूने भरून उभे असलेले 2 ट्रॅक्टर जप्त करीत पुढील कार्यवाहीस्त्व जप्त वाहन मौदा पोलीस स्टेशन ला हलवित फिर्यादी नायब तहसिलदार राजेश माळी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी चार वाहनचालक वाहनमालक विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार कन्हान नदी पात्रावर असलेले विनालीलावीत सोनेगाव रेती घाटावर अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच नायब तहसिलदार राजेश माळी व पथकाने आज सकाळी 10 वाजता यशस्वी धाड घातली असता सोनेगाव वाळू घाटावर दोन ट्रक अवैध वाळू उत्खनन करून वाळू वाहून नेत असलयाच्या बेतात दिसुन आले तसेच वाळू घाटाच्या कडेला असलेल्या रस्त्यावर दोन ट्रॅकटर वाळूने भरून दिसून आले यावेळी वाहनचालकांनी घटनास्थळहून वाहन सोडून पळ काढण्यात यश गाठले.
या कारवाहितुन ट्रेकटर क्र एम एच 40 बी जी 1639, एम एच 40 सी ए 5746 व ट्रक क्र एम एच 36 एफ 397, एम एच 40 एन 6876 जप्त करून सदर चारही आरोपी ट्रक व ट्रेकटर चालक मालक विरुद्ध गुन्हा दाखल करीत सदर चारही ट्रक व ट्रेकटर मौदा पोलीस स्टेशन ला जप्त करण्यात आले.
ही यशस्वी कारवाही तहसिलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात परिक्षाविधीन तहसीलदार राजेश माळी, ,मंडळ अधिकारी संजय अनव्हाने, तलाठी नितीन उमरेडकर, तलाठी विनोद डोळस.तसेच मौदा पोलीस स्टेशन चे पोलीस पथकाने मोलाची भूमिका साकारली.