कामठी :-नागपूर जिल्हा परिषद चे शिक्षण व अर्थ समिती सभापती भारती पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभाग पंचायत समिती कामठीची आढावा सभा घेण्यात आली. या सभेस सभापती उमेश रडके , उपसभापती आशिष मल्लेवार, जी प सदस्य अवंतिकाताई लेकुरवाळे , जि.प. सदस्य, ज्ञानेश्वरजी कंभाले जि.प. सदस्य, श्री दिलीपभाऊ वंजारी पं.स. सदस्य, पुनमताई मालोदे पं.स. सदस्य, दिशाताई चनकापुरे चिंतामण वंजारी, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, , यांच्या उपस्थितीत पंचायत समिती कामठी येथील सभागृहात घेण्यात आली. या आढावा सभेची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली. आढावा सभेचे प्रास्ताविक चिंतामण वंजारी, यांनी केले. कामठी तालुक्याचा आढावा गटशिक्षणाधिकारी कश्यप सावरकर, यांनी सादर केला.
आढावा सभेमध्ये केंद्र प्रमुख , विषय साधन व्यक्ती, विशेष तज्ञ, फिरते विशेष शिक्षक यांनी आपण केलेल्या गुणवत्ते संबंधी कार्याचा आढावा सादर केला.
जी प शिक्षण सभापती भारती पाटील यांनी काम करतांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात घेवून त्यासाठी कृती कार्यक्रमाचे नियोजन करून त्यानुसार कार्य केले तर गुणवत्ता निश्चितच वाढेल, तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती विषयी समाधान व्यक्त केले. पर्यवेक्षिय यंत्रणेने पुढील शैक्षणिक सत्राकरिता योग्य नियोजन करून गुणवत्तेत वाढ करावी. याप्रसंगी शिक्षण विभाग अधीक्षक अनिल पवार, , केंद्र प्रमुख किसमल माकडे, राजेंद्र डोर्लिकर, मंगला हिंगंणघाटे, प्रशांत येवले, कनिष्ठ अभियंता समग्र शिक्षा विवेक जयस्वाल, विषय साधनव्यक्ती कांबळे, ठाकरे, नागदेवे, शालिनी कुंजरकर विशेष साधन व्यक्ती शुभांगी ठाकरे, डाटा एन्ट्री ऑपरेटर चोबे, रोखपाल समर्थ, फिरते विशेष शिक्षक मानकर, भिवगडे, मेहर, अहिरकर, डांगे, हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन ज्योत्स्ना मासरकर साधनव्यक्ती यांनी केले. तर आभार प्रदर्शन शा पो आ कामठी चे अधीक्षक किरण चिनकुरे, यांनी केले.
संदीप कांबळे कामठी