नागपूर: रामझुला हिट अँड रन प्रकरणात बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयाने रितू मालूचा जामीन अर्ज फेटाळला.यानंतर तिला आयडीने (CID) अटक केली आहे. मालू हिच्या अटक प्रक्रियेसाठी रात्री उशिरा पर्यंत न्यायालयात कामकाज चालले.
त्यानंतर रात्री 10:30 वाजताच्या सुमारास न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी (जेएमएफसी) च्या न्यायालयाने मालू हिच्या अटकेची परवानगी दिली. रितिका मालूला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिची कारागृहात रवानगी केली. नागपूरच्या बहुचर्चित रामझुला हिट अँड रन प्रकरणात बुधवारी मोठा ट्विस्ट आला. सत्र न्यायालयाने आरोपी रितू मालूचा जामीन रद्द केला होता. सीआयडीच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे रितिका मालूला रात्री 1.30 वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. गुरुवारी सीआयडीच्या पथकाने रितू मालूला न्यायालयात नेले, तेथे सीआयडीने तिच्या कोठडीची मागणी केली, ही मागणी फेटाळून लावत न्यायालयाने तिला तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले.
दरम्यान 25 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत भरधाव मर्सिडिज कार चालवत रितिका मालू हिने दोन तरुणांना चिरडले. या अपघातात मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता.