नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट कॉक्रीट रोड नागपूर शहर टप्पा (उर्वरीत काम) सेंट्रल बाजार रोड, कल्पना बिल्डींग ते लोकमत चौक पर्यंत डावी व उजवी बाजू दरम्यान रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचे प्रस्तावित केलेले आहे. प्रस्तृत कामाकरीता या रस्त्यावरील वाहतुक प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. सेंट्रल बाजार रोड, कल्पना बिल्डींग ते लोकमत चौक पर्यंत वाहतुकीसाठी दोन्ही बाजुने रस्ता बंद करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. सदर आदेश ९ जानेवारी २०२३ पासून ८ मार्च २०२३ पर्यंत अमलांत राहील, असे आदेशात नमूद केले आहे.
नमुद रस्त्यावरील डाव्या बाजुचे काम सुरु असतांनी वाहतुक लोकमत चौक ते कल्पना बिल्डींग पर्यंत उजव्या बाजुस वाहतुक रस्त्यावरुन वळवण्यात येत आहे. व उजव्या बाजुचे काम सुरु करतांनी वाहतुक लोकमत चौक ते कल्पना बिल्डींग पर्यंत डाव्या बाजुस वाहतुक रस्त्यावरुन वळवण्यात येत आहे. सदर आदेश दिनांक ९ जानेवारी 2023 पासुन दिनांक ८ मार्च 2023 पर्यंत अंमलात राहील.
काम सुरू असलेल्या ठिकाणी मनपा आयुक्तांद्वारे जारी करण्यात आलेले आदेशात या रस्त्यादरम्यान दोन्ही बाजूस ठळक अशा ठिकाणी नागरिकांच्या सुचनेकरिता फलक लावणे, सदर रस्ता वाहतूक बंद करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी कांबी किंवा खांब व इतर संपर्क साधने वापरून रस्त्यावरील वाहतूक बंद करणे, आवश्यक वळण मार्ग दर्शविणारे फलक योग्य त्या ठिकाणी उभारणे, या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी असलेल्या नागरिकांच्या सोयीकरिता अशी व्यवहार्य सुविधा उपलब्ध करणे तसेच विहित कालमर्यादेत काम पूर्ण करून रस्ता वाहतूकीस खुला होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आदेशात नमूद केले आहे की, रात्रीचे वेळी वाहनचालकांना माहितीकरीता एलईडी डाव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीगेटींगवर एलएडी माळा लावणे आवश्यक आहे. उजव्या बाजुचे दुतर्फा व हतुक चालणार आहे त्या ठिकाणी अस्थाई रस्ते दुभाजक तयार करुन एकाच मार्गावरुन दुतर्फा वाहतुक वळविण्यात यावी. अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतुक नियमांचे तसेच वाहतुक पोलीसंनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांचे सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य उपलब्ध करुन घ्यावी. असे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.