सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांच्या हस्ते १२ जणांना चाव्यांचे वितरण
नागपूर : १८ मीटर रस्ता रुंदीकरण प्रकल्पाअंतर्गत बाधीत लाभार्थ्यांचे नागरी येथील बीएसयूएपी (पीपीपी) प्रकल्पामध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसन झालेल्या १२ प्रकल्पबाधीतांना गुरूवारी (ता.१६) सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांच्या हस्ते घराच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.
मनपा मुख्यालयातील सत्तापक्ष कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात अग्निशमन समिती सभापती ॲड.संजय बालपांडे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेतर्फे गीतांजली चौक ते गांधीसागर तलावापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीद्वारे डीपी रोडचे काम सुरू आहे. या कामासाठी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या प्रयत्नामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ कोटी निधी उपलब्ध करुन दिला होता. ६ मार्च २०१९ला रोडच्या भूमिपूजनप्रसंगी प्रकल्पामध्ये ज्या नागरिकांचे घर बाधीत झाले त्यांना पर्यायी घर उपलब्ध करण्यासंदर्भात संबंधित दस्तावेज जमा करण्याचे पत्र देण्यात आले होते. नारी परिसरात एसआरए अंतर्गत निर्मित घरांमध्ये १२ जणांना फक्त ३६००० रुपयांमध्ये घर उपलब्ध करून देण्यात आले. या घरांच्या चाव्या गुरूवारी (ता.१६) सर्व प्रकल्पबाधीतांना प्रदान करण्यात आल्या. मनपाच्या पुढाकाराने सर्व प्रकल्पबाधीतांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे.
यावेळी कुबरा शेख, शेख बब्बू, शेख सुभान, हाजरा खुर्शीद अली, नजमा शेख रहिम, मो.युसूफ मो. रमजान, नुरखान अय्युब मदार खान, बेबी तब्बसुम मो. सफीक, तसलीम कौसर अब्दुल रहमान खान शेख रमजान, रहिम अहमद खान, जमीला शेख बाबु, रजीया बेगम शेख चांद बाबु शेख मियां, शेख लतिफ शेखू मिया, अब्दुल रज्जाक शेखलाल या प्रकल्पबाधीतांना घराच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.