Published On : Sun, Feb 9th, 2025
By Nagpur Today Nagpur News

‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’द्वारे रस्ते आणि उड्डाणपुलांची सफाई सुरु

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे शहरातील रस्ते आणि उड्डाण पुलांच्या स्वच्छतेसाठी चार नवीन ‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’ (Mechanized Road Sweeping Machines) चा मनपा सेवेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या चारही मशीनद्वारे शहरातील रस्ते आणि उड्डाणपुलांची सफाई सुरु करण्यात आली आहे.

मनपाकडे आधी तीन स्वीपिंग मशीनची सेवा उपलब्ध होती. आता नवीन चार मशीनची भर पडल्यामुळे सध्या नागपूर महानगरपालिकेकडे सात स्विपिंग मशीन द्वारे स्वच्छता करण्यात येत आहे. याशिवाय नागपूर महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अजून सहा ‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’ ची मागणी केली आहे.

Gold Rate
Friday 28 March 2025
Gold 24 KT 89,400 /-
Gold 22 KT 83,100 /-
Silver / Kg 101,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरात सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. त्याच प्रमाणे चार पदरी रस्त्यांचे व उड्डाणपुलांचे बांधकाम वेगाने सुरु आहे. रस्ते स्वच्छ करण्याकरीता लागणारे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याच्या कारणाने यांत्रिकी पध्दतीचा वापर करुन मुख्य रस्ते व उड्डाणपुलांची साफसफाई करणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानांचा वापर करणे काळाची गरज असल्यामुळे नागपूर महानगरपालिकेद्वारे १५ व्या वित्त आयोगातील अनुदानातुन चार ‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’ खरेदी करण्यात आलेल्या आहेत.

घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे जुना काटोल नाका ते नवीन काटोल नाका आणि नवीन काटोल नाका ते पारडी एचबी टाउन रिंग रोडवर एक मशीन स्वच्छतेसाठी लावण्यात आली आहे. तसेच दुसरी मशीन पोलीस लाइन तलाव ते शंकरनगर चौक, खामला रोड, पोलीस लाइन तलाव, एनएडीटी ते मेकोसाबाग पुल, कडबी चौक, मंगळवारी कॉम्प्लेक्स ते जिंजर मॉल या मार्गांची स्वच्छता करणार आहे. तिसरी मशीन नरेंद्रनगर पुल ते ऑरेंज सिटी स्ट्रीट, जयताळा बाजार, मनीषनगर आरओबी ते चिंचभुवन डीपी रोड ते खापरी रोड आणि अजनी चौक ते आनंद टॉकीज तसेच एफसीआय गोडाउन रोड ते अजनी रेल्वे स्थानक, कृपलानी चौकापर्यंत स्वच्छता करणार आहे. चौथी मशीन आनंद टॉकीज आरयूबी ते झाशी राणी चौक ते अंबाझरी टी पॉईंट, व्हेरायटी चौक ते वाडी नाका आणि श्री मोहिनी कॉम्प्लेक्स ते सीपी क्लब मार्गावर स्वच्छतेसाठी कार्यरत आहे.

‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’मुळे स्वच्छतेच्या दर्जा सुधारत आहे. सदर मशीनमध्ये पाण्याचा फवारा असल्याने रस्ते स्वच्छ करताना धुळीचे कण हवेत उडत नाहीत. परिणामी प्रदुषण कमी होत आहे. शहरातील कमी रुंदीच्या उड्डाणपुलांची सफाई मनुष्यबळांमार्फत करते वेळी होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत होत आहे. या मशीनमध्ये देण्यात आलेल्या ‘हाय सक्शन हॉस पाईप’च्या मदतीने रस्ते साफ करताना रस्त्यालगत जमा करण्यात आलेल्या कचऱ्यांचे ढिगारे तसेच नागरीकांमार्फत टाकण्यात येणारा कचरा मशीनद्वारे सहजरीत्या उचलण्यात येतो. त्याचप्रमाणे कमी वेळात अधिक रस्ते सफाई करणे शक्य होणार आहे.

Advertisement
Advertisement