Published On : Sat, Jul 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील अयोध्यानगरमध्ये रस्ते तुंबले;स्थानिकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन करत व्यक्त केला संताप

नागपूर : शहरात आज शनिवारी सकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक परिसरात पाणी साचले. इतकेच नाही तर नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांना नाहक त्रासाला समोर जावे लागले.

अयोध्या नगर परिसरातील शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रहिवाशांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.

Gold Rate
Tuesday 28 Jan. 2025
Gold 24 KT 80,300 /-
Gold 22 KT 74,700 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काही दिवसांपूर्वी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांवरून स्थानिक रहिवाशांनी भाजपचे माजी नगरसेवक दीपक चौधरी यांना मारहाण केली होती. बाधित रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या भागात यापूर्वी कधीही पाणी साचले नव्हते.

नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट आणि नागपूर महानगरपालिकेने डांबरी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये रूपांतर केल्यानंतरच ही समस्या सुरू झाल्याने नागरिकांन अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Advertisement