नागपूर : नागपूरच्या धंतोली परिसरात एका रॉयल एनफिल्ड बुलेटला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. गाडीला आग लागल्याचे कळताच चालकाने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केल्याने मोठा अपघात टळला. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
माहितीनुसार बाईकचा मालक कुणाल मेहाडिया आज सकाळी त्याची रॉयल एनफिल्ड बुलेट बाईक घेऊन धंतोलीतील घरातून निघाला.
काही अंतर गेल्यावर त्यांना दुचाकीतून धूर निघताना दिसला. यानंतर कुणालने आपली बुलेट रस्त्याच्या कडेला लावली. पाहताच आगीने पेट घेतला. त्यानंतर स्थानिक लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला.