Advertisement
नागपूर: गुडीपाडव्याच्या मुहर्तावर मोठया प्रमाणात वाहनांची खरेदी होत असल्यामुळे नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून वाहनांचा ताबा मिळावा यासाठी गुडीपाडव्याच्या दिवशी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वाहनांची नोंदणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु राहणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी दिली.
गुडीपाडव्याच्या दिवशी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी म्हणजेच 19, 25, 26 आणि 28 मार्च 2017 या चार दिवशी वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहर व ग्रामीण तसेच सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु राहणार आहे. नागरिकांनी सुट्टीच्या कालावधीत वाहनांची नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी केले आहे.