नागपूर: रेशिमबाग मैदानाचा मुद्दा गाजत असतांना आज जिल्हा,राज्य राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू रेशिमबाग मैदानात एकत्र झाले तेथून नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्वात नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयावर धडकले असता पुलिस विभागातील कर्मचाऱ्यांनी हुज्जत घातली नगरसेवक बंटी बाबा शेळके म्हणाले की कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही हे सर्व सामान्य खेळाडू आहे पुलिस दबाव तंत्राला बळी न पड़ता खेळाडू सुधार प्रन्यासच्या आत घुसले पोलिसांनी वरिष्ठ अधिकारी याना पाचरण केले पण खेळाडू काहीही ऐकणाच्या मनस्तिथ नव्हते,गर्जना करीत विचारले की भ्र्ष्ट अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे का? पण सुधार प्रन्यास च्या गैलरीत जमा असलेल्या एकहि कर्मचाऱ्याने हात वर्ती केला नाही व पाठिंबा दर्शवला नाही यातच दिसून येते की सर्वच भ्रष्ट आहे.रेशिमबाग मैदानात अधिकारी यांच्या संगंमताने कंत्राट दाराने डाम्बर युक्त मटेरियल टाकलेले होते हे मटेरियल अवैधपणे कंत्राटदाराने जमा केले होते याची कल्पना अधिकाऱ्यांना होती नियमबाह्य झालेला हां प्रकार स्थानिक खेळाडू यानी नगरसेवक बंटी बाबा शेळके याना सांगितला असता तिथे येवून खेळाडू यांच्या सोबत मिळून विरोध दर्शविला व विरोध दर्शवल्यानंतर ते मटेरियल उचलण्यात आले,पण अधिकारी मस्तावल्या प्रमाणे वागत आहे त्याचा प्रत्यय आज ही आला.
राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडू याना सरावाकारिता मैदान उपलब्ध आपण करूँन देवू शकत नाही ही एका प्रकारे शोकांतिका सन्मानिय मुख्यमंत्री आणि सन्मानिय केंद्रीय मंत्री यांच्या शहरात आहे.
त्याचा निषेध म्हणून आज खेळाडू यानी नागपूर सुधार प्रन्यास च्या कार्यालयात आपला सराव केला, तिथे फूटबाल,स्किप्पिंग,वॉलीबॉल,सूर्यनमस्कार व इतरही खेळ खेळण्यात आले अधिकाऱ्यांच्या कार्यलयापासून तर सभापतीच्या कार्यलयापर्यन्त दौड़ सुद्धा मारण्यात आली.
नगरसेवक बंटी बाबा शेळके खेळाडू यांच्या सोबत अधीक्षक अभियंता याना झालेला सर्व प्रकार सांगण्यात आला,डॉक्टर अस्सोसिएशनच्या कार्यक्रमात ज्या अधिकाऱ्यांनी कंत्राट दाराच्या साथीने मटेरियल डंप केले होते त्या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे तसेच कंत्राट दाराचा पर्वांना हां रद्द करावा तसेच या पुढे खेळा शिवाय कोणत्याच सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी देवू नए अशी मागणी करण्यात आली.
त्यावर अधीक्षक अभियंता यानी शिष्टमंडळाला सांगितले की आम्ही कुठल्याच सांस्कृतिक कार्यक्रमाला या पुढे परवानगी देणार नाही पण यांच्या आश्वासनाचा अनुभव पाहता आम्हाला त्यांच्यावर विश्वास नाही,अधिकारी व कंत्राट दाराला पाठीशी घातल्यात २ जनवरीला होणारा डॉक्टर एसोसिएशन चा कार्यक्रम उधळून लावू अशी चेतावनी बंटी शेळके यानी तसेच प्रशांत पवार यानी दिली.
ललित चोपड़ा हां खेळाडू चांगले मैदान उपलब्ध नसल्यामुळे सिटी पुलिस भारतीत २ गुण कमी पडल्यामुळे त्याची निवड झाली नाही तसेच सराव करता करता कित्येक खेळाडू जख्मी होतात कारण मैदानावर बोल्डर खिळे गिट्टी पसरलेली आहे,मागे एक कार्यक्रम झाल्यावर तेथील मैदान सुस्थितित न ठेवल्यामुळे मंगेश कावळे नामक खेळाडूचा दोरित पाय अड़कुन फैक्चर झाला याला जबाबदार हे अधिकारी आहे यांची जबाबदारी आहे की मैदानाची देखभाल करने जे खेलाडू जखमी झाले त्याला सुधार प्रन्यास जबाबदार आहे जखमी खेळाडुना आर्थिक मदत करने भाग होते पण मैदानाची नीट दुरस्तिहि करत नाही ? सुधार प्रन्यास कार्यालयातून खेळाडुंनी जिल्हाधिकारी कार्यालयपर्यन्त दौड़ मारली जिल्हाधिकारयाना भेटन्यासाठी ५ खेळाडू चे शिष्ठ मंडल प्रशांत पवार,मंगेश खुरसड़े, निकिता राउत, श्वेता कुकडे, ललित चोपडा, निखिल लोणारे हे जिल्हाधिकार्याना भेटले असता हा सर्व प्रकार त्यांना सांगितला त्यांनी आश्वासन दिले की खेळाडूनची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल मी ना.सु.प्र च्या सभापति शी संवाद साधुन झालेल्या प्रकरणाची चुकशी लावतो असे म्हंटले खेळाडूंनी जो पर्यंत रेशिमबाग मैदानात कार्यक्रम आहे तो पर्यंत आम्हाला ईश्वर देशमुख शारीरिक महाविद्यालयाच्या मैदानात सराव करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा आम्हास रेशिमबाग मैदानात होणारा डॉक्टर असोसिएशन चा कार्यक्रम होऊ देणार नाही असे ठणकाउण सांगितले.
या कार्यक्रमात आयेशा खान, झोया खान, अंकिता भलावी, प्राजक्ता गोडबोले, अश्विनी भोयर, प्रियंका उमरेडकर, स्नेहा पटेल, राजेंद्र ठाकरे, सौरभ शेळके, स्वप्निल बावनकर, हेमंत कातुरे, आलोक कोंडापुरवार, पूजक मदने, आशीप्प्प्न्न्न्न्न्न ष लोनारकर, मयूर माने, नितिन गुरव, रोहित खैरवार, सागर चव्हाण,स्वप्निल ढोके, देवेंद्र तुमाने, नितिन सुरुशे, जीतु मेश्राम, विक्की कलाने, राहुल माताघरे, लोकेश नारनवरे, अश्विन गलकाटे, पवन गलकाटे, अक्षय खोब्रागडे, अनिकेत पारधी, जयंत बांते, कार्तिक गुप्ता, अनूप खोड़कर, सूरज नेवाने, अमोल राखडे, लकी मानकर, विशाल क़लम्बे, पवन कावनपुरे, सूरज चौरे,विराज पोहनकर, हर्षल नाईक इत्यादी खेळाडू व कार्यकर्ते उपस्तिथ होते.