Published On : Tue, Jun 25th, 2024

नागपूर विमानतळावरील धावपट्टीचे काम पुढे ढकलले

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या प्रयत्नांना यश : दुपारनंतरही सुरू राहणार विमान सेवा
Advertisement

नागपूर. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ रनवेचे रिकार्पेंटिंग काम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाने रिकार्पेंटिंगचे काम १५ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलल्यामुळे आता विविध विमान कंपनीचे विमान आता दुपारी सुद्धा आपली सेवा देतील. रिकार्पेंटिंगसाठी विमानतळ सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ७.३० पर्यंत बंद ठेवण्यात आलेले होते.

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांना पत्र लिहून नागपूर विमानतळावर दुपारच्या विमान सेवा सुरु करण्याबाबत निवेदन केले होते. त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाच्या रिकार्पेंटिंगच्या कामाला १५ जुलै ते १५ सप्टेंबर पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. हे काम आता १५ सप्टेंबरनंतर करण्यात येणार आहे.

Advertisement

मिहान इंडिया लिमिटेडच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री यांना दिलेल्या पत्रानुसार विमानतळाच्या रनवे चे रिकार्पेंटिंग २०१४ मध्ये करण्यात आले होते. दहा वर्षानंतर रनवेचे पुन्हा रिकार्पेंटिंग करणे गरजेचे असल्यामुळे त्याबाबतचे नियोजन उन्हाळ्यात करण्यात आले होते. परंतू काही तांत्रिक कारणामुळे ते पुढे ढकलण्यात आलेले आहे.

रिकार्पेंटिंगच्या कामाकरिता सर्व विमान कंपन्यांनी सकाळी १० ते सायंकाळी ७.३० वाजतापर्यंत विमान सेवा बंद केली होती. आता विमान कंपन्यांना नवीन वेळ कळविण्यात आले असून नवीन वेळेनुसार कंपन्या आपली विमान सेवा सुरु करतील.