Published On : Sun, Oct 31st, 2021
By Nagpur Today Nagpur News

एस. टी. कर्मचार्यांच्या समर्थनार्थ पुन्हा भाजयुमोचे धरणे सुरू..!

Advertisement

नागपुर: राज्यातील विविध कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलने स्तगित केले असले तरी राज्यातील काही भागातील एस.टी कर्मचारी संपावर आहेत. नागपुर शहरात एस.टी कर्मचार्यांच्या समर्थनात काल भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, आ. गिरिषजी व्यास यांच्या नेतृत्वात भाजपने धरणे केले.

या वेळी भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके यांनी समाजमाध्यमांशी बोलतांना सांगितले की एस.टी कर्मचार्यांना जेव्हा पर्यंत न्याय मिळत नाही तेव्हा पर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील, त्याचाच प्रत्यय म्हणुन भाजयुमोतर्फे आज सकाळी ६ वाजता पासुनच एस.टी महामंडळाच्या गणेशपेठ आगार येथे आंदोलनाची सुरवात झाली. राज्य सरकारने किती ही दबाव आणाला तरी भारतीय जनता पार्टी एस.टी कर्मचार्यां सोबत ताकदीने उभी आहे असा विश्वास यावेळी कर्मचार्यांना देण्यात आला.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आजच्या आंदोलनाला प्रामुख्याने भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविणजी दटके व भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या मार्गदर्शनात, भाजयुमो प्रदेश सचिव राहुल खंगार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

सोबत भायजुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश राहाटे, भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्क मंत्री मनिष मेश्राम, संपर्क प्रमुख सचिन सावरकर, घनश्याम ढाले, संकेत कुकडे, मंडळ अध्यक्ष शेखर कुर्यवंशी, सन्नी राऊत, अक्षय ठवकर, गौरव हरडे, सागर गंधर्व, अथर्व त्रिवेदी, सौरभ पारशर, रितेश पांडे, अन्नू यादव, राहुल सावडिया, अर्पित मलघाटे, अक्षय शर्मा, नेहल खानोरकर, पवन महाकाळकर, नितिन ईटनकर, शैलेश नेताम, शंकर विश्वकर्मा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement