मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी आता शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली तर ठाकरे गटाचे नेते आंदेश बांदेकर यांना हटविण्यात आले आहे.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. सदा सरवणकर यांचे हार्दिक अभिनंदन करतो. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा! असे प्रसाद लाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सदा सरवणकर हे दादर विधानसभेचे आमदार असून मागील वर्षी प्रभादेवी येथे गणेशोत्सवात शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठा वाद झाला होता. याचदरम्यान सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला होता. पण, चौकशीनंतर त्यांना क्लिन चिट मिळाली. या घटनेनंतर त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. आता सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदावरून आदेश बांदेकर यांची उचलबांगडी करून रवणकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने ठाकरे गटात संतापाची लाट पसरली आहे.