Published On : Tue, Jan 9th, 2018

महा मेट्रो द्वारा सुरक्षा मूल्यमापन

नागपूर : महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कार्य सुरू झाल्यापासून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. सुरक्षतते संदर्भात कोणतीही तडजोड महा मेट्रोकडून स्वीकारल्या जात नसून, शहरात सुरू असलेल्या मेट्रो रेल प्रकल्पाचे कार्य 60 टक्के पूर्ण झाले असताना लवकरच एयरपोर्ट(साऊथ) ते खापरी पर्यंतच्या कमर्शियल (व्यावसायिक) रनला सुरवात होणार आहे. वर्धा महामार्गावरील या ५.५ किलो मीटरच्या कमर्शियल रनसाठी तीनही स्टेशनचे आणि मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्यात सुरु आहे. तेव्हा जसजसे नागपूर मेट्रोचे कार्य पूर्णत्वास येत आहे, तस-तसे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेवरही विशेष भर दिल्या जात असून त्यासाठी नव-नव्या संकल्पना महा मेट्रोतर्फे राबविल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर मेट्रोने दिवस-रात्र काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी सुरक्षा मूल्यमापन सुरू केले आहे. सुरक्षा मूल्यमापन अंतर्गत कर्मचार्‍यांच्या सुरक्षतेसाठी कामाचे मूल्यमापन आणि परीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रासंगिक सुरक्षते संदर्भात प्रशिक्षण, आकस्मित अपघात टाळण्यासाठी उपाय योजना, अनियोजित यातायात आणीबाणीवर मात करण्यासाठी प्रात्यक्षिक आणि मॉक ड्रिल सारखे उपक्रम चालवले जात आहे.

काम सुरु करण्याआधी कर्मचार्‍यांना सुरक्षेसंबंधी शपथ दिली जाते. तसेच मेट्रो कार्य सुरु असलेल्या ठिकाणी हाताळण्यात येणार्‍या उपकरणासंदर्भात काळजी घेऊन सुरक्षतेचे सर्व मूल्यमापन केले जाते. एवढेच नव्हे तर, कर्मचार्‍यांची तत्परता निश्चित करण्याकरिता कार्स्थस्थळांची तपासणी केली जाते. विशेष म्हणजे प्रतेक महिन्याला असे उपक्रम राबविले जात असून यात सुरक्षतेचे सर्व मापदंड पाळनार्‍या कर्मचार्‍यांना “मॅन ऑफ द मंथ”(MAN OF THE MONTH) पुरस्कार प्रदान करण्यात येते. सदर प्रणालीच्या माध्यमातून कंत्राटदार आणि कर्मचार्‍यांना पुढच्या कार्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याशिवाय सर्व दुर्घटनांची नोंद ठेवल्या जाते. अश्या कोणत्याही प्रकारच्या घटनेकडे कानाडोळा न करता घटनेची गंभीर दखल घेतल्या जाते. संबंधीत घटनेची सखोल चौकशी करुण आवश्यक त्या उपाय योजना केल्या जातात. केलेल्या उपाय योजनांची माहिती सर्व कर्मचार्‍यांना देण्यात येते. गरज भासल्यास आवश्यक ती कार्यवाही मेट्रोतर्फे करण्यात येते. जेणे करुण पुन्हा अशी घटना घड़णार नाही अशी खबरदारी घेतल्या जाते.

Advertisement