कन्हान : पोलीस ठाण्यात पोलीसदला तर्फे स्थानिक पत्रकारांचा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती सोहळ्या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार चंद्रकांत काळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बेले उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी पत्रकार दिनानिमित्त समयोचित मार्गदर्शन करून शुभेच्छा व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा पोलीस उपनिरीक्षक हाके यांनी केले.
कार्यक्रमाला खिमेश बढिये, मोतीराम रहाटे, चंद्रकांत जुळे रमेश गोडघाटे, सुनील सरोदे, भिमराव उके, कमल यादव, विवेक पाटील, धनंजय कापसीकर, रवींद्र दुपारे, दिनेश नानवटकर, देवराव इंगळे, जयंत कुभंलकर आदी पत्रकार व पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद धवड, राजेंद्र पाली व पोलीस दलातील कर्मचारी उपस्थित होते.