मुंबई: सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले.वयाच्या ७५ व्या वर्षी मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आज त्यांचे पार्थिव लखनऊमधील सहारा शहरात आणले जाणार असून याठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येईल.
सुब्रतो रॉय यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रविवारी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सुब्रतो रॉय सहारा यांचा जन्म १० जून १९४८ रोजी झाला. ते भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात ‘सहाराश्री’ म्हणूनही ओळखले जात होते. १९९२ मध्ये सहारा समूहाने राष्ट्रीय सहारा नावाचे वृत्तपत्र काढले. याशिवाय कंपनीने ‘सहारा टीव्ही’ नावाचे स्वतःचे टीव्ही चॅनेल देखील सुरू केले होते.