वाडी(अंबाझरी): वाडी व लगतच्या परिसरात गण गण गणात बोते च्या गजरात संत श्री गजानन महाराज प्रगट दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला,वडधामना जवळील नागलवाडी परिसरात श्री सद्गुरू गजानन महाराज सेवाश्रम ट्रस्ट द्वारे संचलित असलेल्या समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज मंदिरात प्रगट दिवसा निमित्य विशेष सप्ताह भर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, प्रगट दिना निमित्य मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली,विशेष म्हणजे या ठिकाणी 13 वर्षांपूर्वी संत गजानन महाराज यांच्या मूर्तीची 13 फेब्रुवारी ला प्रतिष्ठापना देखील प्रगत दिनी करण्यात आली होती.या दोन्ही विशेष बाबी मूळे मंगळवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम काकड आरती,श्रीची पूजा,अभिषेक,सुर्ययोग,दुपारी हरिपाठ, भजन,महाप्रसाद वितरण उत्साहात सम्पन्न झाले.8 तारखेला विशेष गोपाळ काला,ह भ प भास्कर महाराज क्षीरसागर याचे प्रवचन व 13 फेब्रुवारी ला महाराजनची मूर्ती स्थापना दिवशी विविध कार्यक्रम भजन,पूजन,कथा,आदी सम्पन्न होइल अशी माहिती ट्रस्टीनी दिली.
गुरुप्रसाद नगर येथील श्री संत गजानन महाराज सेवा समिती तर्फे दरवर्षी नुसार प्रगट दिन उत्साहात सम्पन्न करण्यात आला. समितीच्या वतीने 31 जानेवारी पासूनच उत्सवाला प्रारंभ करण्यात आला होता. दरोरोज भजन व ह भ प शांताराम ढोले महाराज यांचे विजयग्रंथ पर संगीत प्रवचनाचा लाभ भाविकांनि घेतला. मंगळवारी प्रगटदिनी सकाळपासून मंदिरात संत गजानन महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.सकाळ पासून काकड आरती,अभिषेक,पूजा,महिलांची भजन,दिवस भर उत्साहात सम्पन्न झाले. संध्याकाळी नप अध्यक्ष प्रेम झाडे ,याच्या उपस्थित महाआरती प्रसंगी विशेष अतिथी क्षेत्रा चे खासदार कृपाल तुमाने,आमदार समीर मेघे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी,भाविक सहभागी होते.आयोजक च्या वतीने महाआरती नंतर हजारो भाविकांना महाप्रसादा चे वितरण करण्यात आले.
वाडी नप हद्दीत नवणीतनगर येथिल दत्तमंदिरात 10 दिवसीय श्रीमद भागवत गीता पठण ची सांगता करण्यात आली.कथाचार्य प्रवचनकार अरुण महाराज मोकलकर व संच द्वारे संगीतमय रूपाने सांगता करण्यात आली.सकाळी काकड आरती, दुपारी दहीहंडी,गोपाळकाला,महापूजा व संध्याकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.मंदिर कमिटी आयोजकांनी व्यवस्था केली होती.
सदाचार सोसायटी येथील नगरसेविका कल्पना सगदेव यांच्या तर्फे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगत दिनानिमित्य अभिषेक, महापूजा,दिवसभर महिलांची भजने व संध्याकाली महाप्रसाद चे वितरण करण्यात आले.