Published On : Thu, Dec 28th, 2017

पारशिवनी तालुक्यात शंभर एकर जमिनी विक्रीत गैरव्यवहार

Advertisement

कन्हान: पारशिवनी तालुक्यातील जाणा-या नवीन महामार्ग मुळे अधिक माया जमविता येईल. यासाठी घोटाळे करण्याची बाब नुकतीच उजेडात आली आहे. शंभर एकर शेतजमिनीचे राजकिय दबावाखाली विक्रीपत्र करण्यात आलेची बाब उजेडात आली असून या प्रकरणी दोषी महसुल अधिका-यावर कार्यवाही करण्याची मागणी पिडीत शेतकऱ्यानी पत्रकार परिषदेत केली.

पुणे येथील मँक्सवर्क नामक कंपनीने तालुक्यातील कोंडासावळी, आवळेघाट, सुवरधरा व रामटेक तालुक्यातील सत्रापुर या परिसरातील जवळपास एक हजार एकर शेतजमिन आयुवेदीक प्लांट करिता १९९६ ला खरेदी केली. कोंडासावळी, आवळेघाट, सुवरधरा येथील सहाशे एकर शेतजमिन मँक्सवर्क कंपनी पुणे हिने अंत्यत कवडीमोल दराने पावरऑफ अँटर्नी करून खरेदी केली होती. कंपनीच्या माध्यमातुन या शेतजमिनीवर सुरूवातीचे काही वर्षे वनऔषधीची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीने येथील गाशा गुडाळुन ठेवला. मँक्सवर्क कंपनीच्या वतीने कायदेशीर व्यवस्थापक मुकुंद बर्वे यांने मार्च २००९ मध्ये कन्हान येथील रहिवासी नारद दारोडे यांच्या सोबत १०० एकर शेतजमिनीचा विक्रीचा सौदा केला. नारद दारोडे, गेंदलाल काठोके, प्रकाश वंजारी, विनोद मेश्राम, अँड संजय राव, नारायण बालकोटे, देवराव बालकोटे या सात जनानी मिळुन सदर शेतजमिनीची रितसर रजिस्ट्री करून घेतली.

Gold Rate
18 April 2025
Gold 24 KT 95,900 /-
Gold 22 KT 89,200 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मात्र पावरऑफ रजिस्ट्री असल्यामुळे नवीन शेतमालकांचे नाव चढले नव्हते. या प्रकरणाची सुनावणी उपविभागीय अधिकारी रामटेक यांचेकडे सुरू आहे. सदर संधीचा फायदा घेत राजकिय शक्तिचा वापर करत एका माजी आमदाराने आपल्या नातलगाच्या नावे शेतजमिनी खरेदीचे सोपस्कार पुर्ण केले. याकरिता सदर आमदाराने तहसिलदार अक्षय पोयाम या महसुल अधिका-यांच्या माध्यमातून शंभर एकर शेतजमिनीच्या सातबा-या मध्ये फेरफार करून मुळ शेतकऱ्याचे नावे चढवुन ऑगस्ट २०१७ मध्ये विक्रीचे आदेश काढले. सदर शेतजमिनी माजी आमदारांचे बंधु अनिल जैस्वाल, व इतर सात जनाच्या नावे खरेदी केली.

मुळ शेतजमिनी मालकांनी १९९६ ला सदर जमिनी कंपनीला विक्री केली असल्यामुळे मुळ शेतकऱ्याचे नावे विक्री व्यवहार करणे बेकायदेशीर असुन यात मोठ्या प्रमाणावर धनलक्ष्मीचा वापर करण्यात आल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष नारद दारोडे, न. प. कन्हान चे सभापती गेंदलाल काठोके यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. सदर प्रकरण आमदार रेडडी यांनी २१ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात विधानभवनात उचलुन धरले होते. बेकायदेशीरित्या शेतजमिनीची विक्री करण्या-या तहसिलदार पोयाम, मंडळ अधिकारी राजेश घटे, नरेंद्र येवणे यांना निलंबित करून विभागीय चौकशी करण्यात यावी तसेच बेकायदेशीरित्या शेतजमिन खरेदी करण्या-या व शासनाची दिशाभुल करण्या-या अनिल जैस्वाल व इतर सात जणाविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष नारद दारोडे, न. प. कन्हानचे सभापती गेंदलाल काठोके, भाजप नेते जिवन मुंगले, सचिन घोडमारे, प्रकाश वंजारी उपस्थित होते.

. सदर प्रकरण न्यायालयीन — तहसिलदार पोयाम.
. शंभर एकर शेतजमिनीच्या फेरफार प्रकरणीचे प्रकरण न्यायालयात दाखल आहे. त्यामुळे यावर अधिक भाष्य करता येणार नाही. मात्र याच प्रकरणात नारद दारोडे यांच्यावर २०११ मध्ये शासनाची दिशाभुल करण्या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती तहसिलदार अक्षय पोयाम हयांनी दुरध्वनीवरून बोलताना दिली.

Advertisement
Advertisement