– शिक्षिका अनुपस्थीत, शाळेला दिली होती सुटी,हजेरी बुकात अनेक चुका
काटोल: जिल्हा परिषद शाळेचा कारभार पाहण्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी त्यांच्याच मेंटपांजरा जिल्हा परिषद सर्कल मधील वसंतनगर जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली. तेथील कारभार पाहुण सलील देशमुख चांगलेच संतापले. एक शिक्षीका कोणताही अर्ज न देता सुटीवर तर होतीच परंतु त्याची कोणतीही नोंद ही हजेरी बुकावर घेण्यात आली नव्हती.
गरिब विदयार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च होतात. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याची योग्य पध्दतीने अंबलबजावनी होत नसल्याच्या काही तक्रारी या सलील देशमुख यांच्याकडे आल्या होत्या. याच दरम्यान त्यांनी दुर्गम भागातील वसंतनगर येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी जो प्रकार पाहीला त्यांवर ते चांगले संतापले. यावेळी शाळेत मुख्यध्यापिका एम.बी. परमाल या उपस्थीत होत्या. एकही विदयार्थी शाळेत उपस्थित नव्हते. यासदंर्भात त्यांनी परमाल यांना विचारणा केली असता गावात संध्याकाळी कार्यक्रम असल्याने सुटी देण्यात आल्याचे सांगीतले. नियमानुसार आपणांस अशी सुटी देता येते का असे देशमुख यांनी विचारता कोणतेच उत्तर देण्यात आले नाही.
याच दरम्यान सलील देशमुख यांनी दुसऱ्या शिक्षिका रेखा मस्के कुठे आहे याची विचारणा केली. तर त्या सुटीवर असल्याचे परमाल यांनी सांगीतले. याच दरम्यान देशमुख यांनी शिक्षकांच्या हजेरी पुस्तीका बघीतली असता, मस्के यांचा १३ फेब्रुवारीचा किरकोळ रजेचा अर्ज दिसला. परंतु १४ तारखेचा कोणत्याही उल्लेख त्यात नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे १३ फेब्रुवारीचा सुटीचा अर्ज असतांना त्यांची कोणतीही नोंद ही हजेरी बुकात करण्यात आली नव्हती. तसेच १४ तारखेला मस्के या सुटीवर असतांना त्यांची कोणतीही नोंद नव्हती. यामुळे सलील देशमुख यांनी लागलीच गट शिक्षण अधिकारी दिनेश धवड यांना फोन करुन संपुर्ण माहीती देवून तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले.
शाळेत आल्यावर प्रसन्न वाटले पाहीजे, विदयार्थ्यांना चांगले शिक्षण दिले पाहीजे. परंतु वसंतनगर येथील शाळेत असे काहीच दिसत नसल्याने सलील देशमुख यांनी खंत व्यक्त केली. शाळेत सर्वत्र घाण, साहीत्य अस्थाव्यस्त पडलेले होते, हा सर्व प्रकार पाहुण मी अचंबीत झालो असे मत सुध्दा सलील देशमुख यांनी व्यक्त केले. लवकरच यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी वशाळा व्यवस्थापन समिती यांची बैठक लावून या संपूर्ण प्रकाराची माहिती घेणार असल्याचे सुद्धा सलील देशमुख यांनी सांगितले.