Advertisement
मुंबई: अभिनेता सलमान खानच्या घरावर १४ एप्रिल २०२३ रोजी गोळीबार झाला होता. गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्रे पुरवणाऱ्या आरोपी अनुज थापनने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर त्याला जीटी रुग्णालयात नेण्यात आले होते, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
माहितीनुसार, आरोपीला पोलीस मुख्यालयात लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं, तिथेच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.पहिल्या मजल्यावरील पोलीस लॉक-अपच्या बाथरूममध्ये सकाळी ११ वाजता ही घटना घडली,असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
यानंतर त्याला तातडीने मुंबईच्या जीटी रुग्णालयात दाखल नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.आरोपी अनुज थापन हा बिष्णोई टोळीशी संबंधीत असून त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.