Published On : Tue, Mar 12th, 2024

नागपुरात ‘बर्ड फ्लू’’संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कातील ८७ कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले !

Advertisement

नागपूर: शहरात प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममधील काही कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत शेकडोंच्या संख्येत कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. यानंतर त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे, भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यांत आले.

त्याचा अहवाल प्राप्त झाला असून बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Advertisement

याप्रकाराचे गांभीर्य पाहता संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कातील ८७ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नमुने एम्सच्या प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले तर सर्वेक्षणाचा परिघही १ किलोमीटरवरून तीन किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आला.

नागपूर महापालिकेने थेट संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या ८७ कर्मचाऱ्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने एम्सच्या प्रयोगशाळेत पाठवले. पथकाच्या सूचनेवरून नागपूर महापालिकेने केंद्राच्या तीन किलोमीटर परिघात सर्वेक्षण सुरू केले आहे. या परिघात सुमारे दीड लाख लोकसंख्या येते. त्यामुळे हे सर्वेक्षण पूर्ण करायला सुमारे चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे.