नागपूर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. रकारने ७०१ किलोमीटर लांबीच्या मुंबई नागपूर द्रुतगती महामार्गाचे काम पूर्ण केले आहे.
त्याचे उद्घाटन फेब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित आहे. या एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून प्रवासी नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या 8 तासात पूर्ण करतील.
सध्या नागपूरपासून इगतपुरीपर्यंतचा (625 किलोमीटर)महामार्ग कार्यान्वित आहे. अशातच आता समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते मुंबईदरम्यानचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पाही आता पूर्ण झाला आहे. या महामार्गाच्या पूर्णत्वामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर आता 16 तासांऐवजी केवळ 8 तासांत कापता येणार आहे. हा प्रकल्प पंतप्रधान मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो, जो महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी गेम चेंजर ठरणार आहे.
देशातील सर्वात अत्याधुनिक एक्सप्रेसवे –
– हा 6 लेनचा, 120 मीटर रुंदीचा आणि 701 किलोमीटर लांब महामार्ग देशातील सर्वात अत्याधुनिक एक्सप्रेसवे आहे, जो 150 किमी प्रतितास गतीने प्रवासासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
– महामार्गावर 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, 6 बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास आहेत.
– इगतपुरी ते मुंबईदरम्यान कसारा जवळ 8 किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे, जो अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टमने सुसज्ज आहे.