नागपूर : स्थानिक भाजपच्या पदाधिकारी सना खान हत्याकांड प्रकरणी नवनवीन घडामोडी घडत आहेत. या प्रकरणात मुख्य सूत्रधार अमित ऊर्फ पप्पू रज्जनलाल साहू (३८) याच्यासह पाच आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे.
या आरोपींमध्ये राजेशसिंग सूरजसिंग ठाकूर (४०, रा. फुलर भिटा, ता. शाहपुरा), धर्मेंद्र रविशंकर यादव (३७, रा. शास्त्रीनगर, जबलपूर), रविशंकर ऊर्फ रब्बू चाचा भगतराम यादव (५५, रा. शास्त्रीनगर, जबलपूर) व कमलेश कालूराम पटेल (३५, रा. गुप्तानगर, जबलपूर) यांचा समावेश आहे.
सरकारच्या वतीने अनुभवी ॲड. रश्मी खापर्डे खटल्याचे कामकाज पाहणार आहेत. तर दुसरीकडे आरोपींविरुद्ध २०८ पानांचे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. त्यात भारतीय दंड विधानातील कलम ३६४ (अपहरण), ३०२ (हत्या), २०१ (पुरावे नष्ट करणे), १२०-ब (कट रचणे), ५०४ (अपमान करणे) व ५०६ (धमकी देणे) या सहा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.