नागपूर: सना खान हत्याकांडातील आरोपी अमित शाहूविरोधात मानकापूर पोलीस स्टेशमध्ये नवीन तक्रार दखल करण्यात आली आहे.लोकांना धमकवून पैसे उकळण्याचा आरोप शाहूवर करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,आरोपी शाहू हा त्यांच्या ३५ वर्षीय मुलगी आणा खान ( बदललेले नाव) हीच्या माध्यमातून राजकारणाशी संबधित लोकांकडून तसेच इतर ओळखीच्या लोकांकडून त्यांची फसवणूक करण्यास प्रवृत्त करत होता. तसेच तो आणा हिला त्या व्यक्तींसोबत शारारिक सबंध करण्यास आणि अश्लील व्हिडिओ करण्यास भाग पाडत होता.
तो आणा खानवर दबाव टाकून मानसिक त्रास द्यायचा इतकेच नाही तर तिला वारंवार मारण्याची धमकी देत होता.
त्या अश्लिल व्हिडीओ व फोटो द्वारे अमीत शाहू व त्याचे जबलपुर आणि नागपुर येथील साथीदार त्या लोकांना धमकावून दबाव टाकून ब्लॅकमेल करून जबरदस्ती पैश्याची मागणी करीत होते. अश्लिल व्हिडीओ व फोटो द्वारे आरोपी अमीत शाहूने त्याच्या जबलपूर आणि नागपूर येथील साथीदारांकडून आजपर्यंत अनेक लोकांकडून पैसे उकळले आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शाहू विरोधात मानकापूर पोलीसांनी २८७/२३ कलम ३८४. ३८६, ३८९, ३५४(डी), १२०(ब), ३४ भादंवि सह कलम ६६ (ई), ६७, ६७ (अ) आयटी.कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास नागपुरच्या सायबर विभागाकडून तांत्रिक मदत घेऊन करण्यात येत आहे.