Advertisement
नागपूर : भाजप नेत्या सना ऊर्फ हिना खान हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी हालचाली सुरु केल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही सना यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही. असे असले तरी आरोपी विरुद्ध भक्कम असे तांत्रिक पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
जबलपुरातील कुख्यात गुन्हेगार अमित शाहूने सनाशी लग्न केले होते. २ ऑगस्टला सना जबलपूरला गेली असता त्यादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. यात अमितने सना हिची हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलिसांना तिचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही.त्यामुळे आरोपींची बाजू भक्कम होतांना दिसत आहे.