Advertisement
नागपूर: नागपूर जिल्हा ग्रामीण शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. संदीप वसंतराव ईटकेलवार यांनी आज शुक्रवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त म्हणून पदभार स्विकारला. मा. खासदार श्री. कृपाल तुमाने व मा. आमदार श्री. आशिष जैस्वाल यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. संदीप यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, सन्मित्र मंडळ आणि लाॅयन्स क्लब ऑफ नागपूरचे सदस्य उपस्थित होते.