मुंबई – केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या निर्णयावरून देशभरात संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी भाजपा खासदार स्मृती इराणी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे खुले आवाहन करत, गॅस सिलिंडर आम्ही देतो, तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या आणि महागाई विरोधात आंदोलन करा, अशी खोचक ऑफर दिली आहे.
गॅस दरवाढ म्हणजे लोकांची लूट –
गभरात कच्च्या तेलाच्या किंमती घसरत असताना भारतात मात्र दरवाढीचं सत्र सुरूच आहे. ही लूट नाही तर काय?” त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावरही टीका करत म्हटलं, “महागाईने हैराण जनतेवर आता आणखीनही ओझं टाकलं जातंय. सरकारला सामान्यांचे काहीही देणंघेणं राहिले नाही, असे राऊत म्हणाले.
इराणी आणि कंगनाला सडेतोड आव्हान-
गृहिणींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या गॅस दरवाढीविरोधात जर का तुम्ही (इराणी आणि कंगना) खरंच महिलांसाठी लढता, तर या आंदोलनाचं नेतृत्व करा. रस्त्यावर या, सिलिंडर आम्ही पुरवतो,” असं सांगत राऊतांनी भाजप समर्थकांवर थेट निशाणा साधला. यावेळी राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केले. त्यांचा पक्ष कुठेच उरलेला नाही. त्यांची जिंकलेली बहुतेक जागा ही भाजपा आणि ईव्हीएमच्या जुगाडामुळे मिळाल्या, असा दावा करत राऊतांनी शिंदेंवर टिका केली.