Advertisement
कन्हान : – संत तुकाराम मंदीर, तुकाराम नगर कन्हान येथे भजनाचा कार्यक्रम करून जगतगुरू संत तुकाराम महाराजा ना विन्रम अभिवादन करून बीज कार्यक्रम संपन्न झाला.
जगतगुरू संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रमा निमित्य संत तुकाराम मंदीर, तुकाराम नगर कन्हान येथे संत गजानन भजन मंडळ कन्हान कांद्री व्दारे भजनाचा कार्यक्रम करून जगत गुरू संत तुकाराम महाराजांना विन्रम अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संत गजानन भजन मंडळाचे श्री भगवान लांजेवार तालुकाध्यक्ष महाराष्ट्र शाहीर परिषद पारशिवनी, चिरकुटजी पुंडेकर, पुरूषोत्तम कुंभलकर, गजानन वडे, विश्वनाथ चौधरी, जगदीश वाघमारे, हरिनाथजी लेंडे, नथुजी चरडे, विनोद पोहणकर, देवराव गोतमारे, विमलबाई वडे, सुर्यभानजी घोडकी आदीने भजन, अभंग गायन करून व संत तुकाराम महाराजाना पुष्प अर्पण करून अभिवादन करून बीज कार्यक्रम संपन्न केला.