Published On : Sun, Dec 19th, 2021
By Nagpur Today Nagpur News

दारूची नशा चढली…गाडी रिव्हर्स करताना 3 मित्रांना चिरडलं, पाहा अपघाताचा भीषण व्हिडीओ

Advertisement

कार रिव्हर्स घेताना वाहन चालकाने बाळगलेली निष्काळजी रस्त्यावरील तरुणाला चांगलीच महागात पडली. ड्रायव्हरने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबल्यामुळे पार्किंगमधून गाडी बाहेर काढताना ती जोरदार वेगाने मागे आली आणि कारने एकाला चिरडलं. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे, तर दोघे जण थोडक्यात बचावले. नागपुरात घडलेली ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे. मेन रोडच्या जवळच संबंधित चारचाकी गाडी पार्क करण्यात आली होती. ड्रायव्हर ती काढण्याचा प्रयत्न करत असताना हा भीषण अपघात झाला.

Gold Rate
08 April 2025
Gold 24 KT 88,100/-
Gold 22 KT 81,900/-
Silver / Kg - 90,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नेमकं काय घडलं?

संबंधित चालक पार्क केलेली पांढऱ्या रंगाची कार बाहेर काढत होता. त्याने गाडी रिव्हर्समध्ये घेतली. यावेळी ब्रेकवर पाय ठेवण्याऐवजी ड्रायव्हरने अ‍ॅक्सिलरेटरवर पाय ठेवला. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेली गाडी रिव्हर्समध्ये जोरदार वेगाने आली.

एक जण गंभीर, दोघे बचावले

यावेळी बाजूलाच असलेल्या सार्वजनिक बाकड्यावर तीन युवक मोबाईल बघत बसले होते. यातील दोघांनी प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला, मात्र एक जण त्यात अडकला आणि कारच्या धक्क्याने गंभीर जखमी झाला. त्यानंतरही कार फिरुन दुसऱ्या बाजूला जाऊन थांबली.

ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. परिसरातील व्यक्ती आवाज ऐकून धावत अपघातस्थळी पोहोचली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणाच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

पाहा व्हिडीओ :

Advertisement
Advertisement