मुंबई: भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक असलेल्या सारस्वत बँकेने आपल्या रिटेल आणि कॉर्पोरेट ग्राहकांना विविध डिजीटल बँकींग सुविधा पुरविण्यासाठी बँकींग क्षेत्रात डिजीटल पर्याय आणि सुविधा पुरवण्यात आघाडीची कंपनी असलेल्या टॅगिटबरोबर करार केला आहे
सारस्वत बँकेने आपले क्षेत्र महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये विस्तारलेले आहे. बँकेने मार्च 2022 अखेरीस एकूण 71 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून 275.02 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. बँकेचे निष्क्रीय मालमत्ता मूल्य(एनएव्ही) सर्वाधिक अल्प म्हणजेच 0.65 टक्के इतके असून व्यवसायाची मजबूत स्थिती त्यातून दिसून येते.
मोबीक्स डिजीटल बँकींग मंचामुळे नवीन डिजीटल सेवा सुरु करण्याच्या बँकेच्या क्षमतेला वेग मिळणार असून त्यामुळे सतत नाविन्यपुर्ण आणि अधिकाधिक सेवा सुरु करत ग्राहकांची संख्या वाढविता येणार आहे. नवीन डिजीटल सेवांमुळे अधिकाधिक डिजीटल चॅनल्सचा वापर करण्याचा बँकेच्या ग्राहकांचा वेग वाढणार असून त्यामुळे बँकेला स्पर्धेला तोंड देता येईल आणि बाजारपेठेतील आपला हिस्सा देखिल वाढविता येणार आहे.
मोबिक्सचा वापर करत सुरक्षित आणि कोठूनही, चोवीस तास व्यापक डिजीटल सेवा पुरवत आपल्या ग्राहकांचा अनुभव बँकेला उंचावता येणार आहे.भारतीय बाजारातील यशस्वी कामगिरी आणि डिजीटल बँकींग मंचावर सवोत्तम पर्याय यामुळे बँकेने टॅगिटची निवड केली आहे.
विविध पर्यायांची मुख्य वैशिष्ट्येः
1. बहुपर्यायी ऑथेंटिकेशन, बायोमेट्रीक लॉगिन आदींमुळे व्यापक सुरक्षितता प्रदान होते.
2. रिटेल ग्राहकांना स्वयंनोंदणी सुविधा उपलब्ध होणार असल्याने ग्राहक सेवा पातळीवर कामकाजात अधिक क्षमता प्राप्त करण्यात बँकेला मदत होणार
3. बँकेद्वारे प्रदान केलेल्या सध्याच्या कार्यक्षमतेचा विस्तार करताना ग्राहकांनी डिजिटल चॅनेलचा अवलंब करण्यास गती देण्यासाठी पूर्णत: अंगभूत आणि विविध चॅनेल्सचा वापर
4. ग्राहकांसाठी स्थिर आणि “नियमित कार्यरत” वातावरण
नवीन भागीदारीबाबत बोलताना सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर म्हणाले की, नवीन युगातील तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आणि तंत्रज्ञानावर आधारित विविध उपक्रम राबवण्यात सारस्वत बँक नेहमीच आघाडीवर राहिली आहे. मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या नवीन ऍप्लिकेशनद्वारे आमच्या ग्राहकांना सर्व चॅनेलयुक्त सुविधा प्रदान करण्यासाठी टॅगिटसोबतची आमचा भागीदारी हा असाच एक उपक्रम आहे. या निरंतर वाटचालीमध्ये ग्राहकांना अखंड संपर्क आणि समृध्द असा अनुभव मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टॅगिटचे सीईओ संदीप बगारिया (Bagaria) म्हणाले की, भारतीय बाजारपेठेतील आमचे मजबूत स्थान आणि कौशल्यासह, डिजिटल क्रांतीच्या बरोबरीने वाटचाल करत राहण्यासाठी त्याचबरोबर डिजिटल परिवर्तनाचा वेग वाढवण्याचा त्यांचा ध्यास प्रत्यक्षात साकारण्यासाठी बँकेला पाठबळ देताना टॅगिटला आनंद होत आहे.
मोबाईल आणि वेब या दोन प्रकारात नानाविध प्रकारच्या सेवा मोबिक्स मंच बँकेच्या रिटेल आणि व्यावसायिक ग्राहकांना सर्वसमावेषक वैशिष्ट्ये, अव्दितीय विविध चॅनेल्स आणि बळकट सुरक्षा यासह अखंडपणे प्रदान करणार आहे. त्यामुळे बाजारपेठेतील विस्तारवाढ, बाजारपेठेत गतीमानता आणि ग्राहकांबरोबर संबंध आणखी दृढ होईल.