केंद्र सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्राीय प्रचार कार्यालय आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रा प्रदर्शनाचे उद्घाटन आज गुरुवार, दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजी विश्वविद्यालयाचे सन्माननीय कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या शुभहस्ते वेदमंत्रांच्या घोषात दीपप्रज्वलन करून संपन्न झाले.
विश्वविद्यालयाचा जनसंपर्क कक्षाच्या विशेष सहकार्याने केंद्रीय संचार ब्युरो तर्फे आयोजित या प्रदर्शनाचे सन्माननीय कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी, कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय यांच्यासह सर्व अधिकारी व अधिष्ठाता यांनी अवलोकन केले.
या उद्घाटन समारोहानंतर झालेल्या विशेष कार्यक्रमात व्यासपीठावर सन्माननीय कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी, कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, पूर्व कुलगुरू प्रो. मधुसूदन पेन्ना, अधिष्ठाता प्रो. ललिता चंद्रात्रो, वित्त व लेखा अधिकारी प्रो. कविता होले, रामटेक परिसर संचालक प्रो. हरेकृष्ण अगस्ती, विद्यापीठ नियोजन मंडळ संचालक प्रो. प्रसाद गोखले, परीक्षा नियंत्राक डाॅ. जयवंत चैधरी, ग्रंथपाल डाॅ. दीपक कापडे, केंद्रीय संचार ब्युरो चे क्षेत्राीय प्रचार अधिकारी श्री. सौरभ खेकडे, जनसंपर्क अधिकारी डाॅ. रेणुका बोकारे उपस्थित होते.
प्रास्ताविक श्री सौरव खेकडे यांनी केले. भारत सरकारतर्फे राष्ट्रपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य, त्यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीतील योगदान सर्वांपर्यंत विशेषतः शिक्षण क्षेत्रातील नव्या पिढीपर्यंत पोचावे, यासाठी या मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
क्षेत्राीय प्रचार कार्यालयाद्वारे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिह्न देवून सत्कार करण्यात आला. विश्वविद्यालयातर्फे मा. कुलगुरू प्रो. त्रिपाठी यांनी श्री खेकडे यांचा शाल, सन्मानचिह््न देवून सत्कार केला.
कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय म्हणाले, ‘ भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात सरदार वल्लभभाई पटेल यांचे पूर्णाकृती स्मारक उभारून, त्यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीत दिलेल्या योगदानाचा मोठाच गौरव केंद्रसरकारने केला आहे. भारताच्या निर्मितीतील त्यांचे योगदान संस्मरणीय आहे; ते या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखविणे नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. मी याचे स्वागत करतो आणि क्षेत्राीय प्रचार अधिकारी श्री सौरव खेकडे यांना या कार्यात विश्वविद्यालयाला सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद देतो.’
उद्घाटनपर भाषणात मा. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी म्हणाले, आदरणीय पटेलजींच्या जीवनावरील हे प्रदर्शन खरोखर दुर्लभ, संग्रहणीय अशा दस्तावेजांनी, छायाचित्रांनी युक्त आहे. भारतातील जुन्या घराण्यांना भारत सरकारात विलय करण्याचे महत्त्वाचे कार्य पटेलांनी केले. अखंड भारताचा आणि सर्व धर्म,भाषा, प्रांत यांचा विचार न करता केवळ भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा त्यांनी पुरस्कार केला. सरदार पटेल हे द्रष्टे राष्ट्रपुरुष होते. त्यांनी नर्मदेचे 90 टक्के पाणी हे संरक्षित करून दुष्काळग्रस्त असलेल्या राजस्थान, गुजरात मधील भूज कच्छ या प्रदेशांना पुरविण्यात यावे हा विचार केला होता. अखंड राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार असणा-या सरदार पटेल यांच्या प्रदर्शनामुळे युवा विद्याथ्र्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने असे कार्यक्रम घेण्यासाठी विश्वविद्यालय नेहमीच सहकार्य करेल असे आश्वासनही मा. कुलगुरू यांनी दिले. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी श्री. सौरव खेकडे आणि जनसंपर्क अधिकारी डाॅ. रेणुका बोकारे यांचे अभिनंदन मा. कुलगुरू महोदयांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी व प्रदर्शनाच्या संयोजिका डाॅ. रेणुका बोकारे यांनी केले. शांतिमंत्राने कार्यक्रमाची समाप्ती झाली.