नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुर्ती ग्रामपंचायतीचे सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहन जगन्नाथ मुन्ने (५४) यांना लँड डेव्हलपर्सकडून ३ लाखांची लाच घेताना अटक केली आहे.पंचायतवर भाजपाचा सरपंच निवडून आला आहे.
मुन्ने याने यापूर्वी लाचेचा भाग म्हणून एक लाख स्वीकारले होते.
काटोल येथील पांडे लेआऊटमधील रहिवाशाने मुन्ने यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली. लाच घेताना मुन्ने याला रंगेहात पकडण्यात आले. परेश शेळके नावाच्या इसमाचाही या गुन्हयात सहभाग असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान नागपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (ऐजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशिर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविण्यात यावे.