बेला: दिनांक 15 व 16 फेब्रुवारी 2024 ला ग्रामपंचायतीचे भव्य पटांगणावर स्वर्गीय आनंदरावजी कांबळे स्मृति प्रित्यर्थ, खुल्या गटातील पुरुषांचे कबड्डी सामने आयोजित केले होते, त्याची सांगता 16 फेब्रुवारीला रात्री बारा वाजता झाली.
प्रथम पारितोषिक 30,001 रुपये रोख स्व.शशिकांत झिले स्थितीत्यर्थ, स्वर्गीय सुमित्राबाई राठोड स्मृती पित्यर्थ अनिल नामदेवरावजी राठोड, सानिया लँड डेव्हलपर्स संजय अब्लमकर यांच्याकडून प्रथम पारितोषिक व मयूर गंधारे यांच्याकडून चषक देण्यात आले हे प्रथम पारितोषिक सेंट्रल रेल्वे नागपूर या संघाने पटकविले, दुसरे पारितोषिक वीस हजार एक रुपयांचा रोख राहुल रोहिदास काकडे व आदीयोगी कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर अक्षय रमेश उमाटे यांच्या संयुक्त विद्यमाने व रवी वरघाने यांच्याकडून चषक. या पारितोषिकाचे मानकरी ठरले.
स्वर्गीय हर्षद बोबडे क्रीडा मंडळ नंदुरी. तिसरे पारितोषिक दहा हजार एक रुपये रोख स्वर्गीय प्रदीप ज्ञानेश्वरराव पाटील स्मृति प्रित्यर्थ संकेत प्रदीप भाऊ पाटील यांच्याकडून आणि शुभम खोडके यांच्याकडून चषक, ते पटकविले, गर्जना क्रीडा मंडळ वर्धा यांनी. मॅन ऑफ द सिरीज महेश तुकारामजी बोकडे यांच्याकडून होते ते सेंट्रल रेल्वेचे जगदीप नरवाल यांना देण्यात आले. मॅन ऑफ द मॅच प्रेमदास पुंडलिक भुसारी यांच्याकडून होते ते साहिल मोरे याला चांदीचे ब्रासलेट देण्यात आले. उत्कृष्ट संघ भीमादेवी भिवापूर शैलेश बेडे तर्फे 10 स्पोर्ट बँग, दुसरा उत्कृष्ट संघ न्यू ताज क्रीडा मंडळ नागपूर प्रमोद वरघने तर्फे दहा वॉल वॉच , उत्कृष्ट रेडर ला दिवाकर बाकडे यांचेकडून सिलिंग फॅन, सामन्यामध्ये उत्कृष्ट पकड घेणाऱ्या खेळाडूला कृष्णा अण्णाजी मेंढुले यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आली.
सरपंच चषक म्हणून आयोजित केलेले हे सामने सोळा सांघा मध्ये साखळी पद्धतीने खेळविण्यात आले, या सामन्याचे उद्घाटन शनिवार दिनांक 15 फेब्रुवारीला सुनील बाबू केदार माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय खासदार श्याम बाबू बर्वे, आमदार संजय जी मेश्राम, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कोकुर्डे ताई, माजी उपाध्यक्ष कुंदाताई राऊत, वंदनाताई बालपांडे माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच अरुण बालपांडे, उपसरपंच प्रशांत लांबट, बेला पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज कांबळे, सचिन दहिकर, बालू भाऊ लोहकरे, दादा शेंडे, अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला, कबड्डी क्षेत्रातले गुरु दादा शेंडे यांना संघर्ष क्रीडा मंडळाने सन्मानित करून मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
बक्षीस वितरणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राजेंद्र बाबू मुळक यांनी भेट देऊन. संघर्ष क्रीडा मंडळ बेल्याला स्वर्गीय भाऊसाहेब मुळक स्मृतिप्रित्यर्थ कबड्डी खेळाची मॅट देण्याचे आश्वासन दिले. गजानन चिंचुलकर, विलास गलांडे, विलास वाहूकर, यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला.
सामनेच्या आयोजना प्रवीण देशमुख, राजेंद्र सूर्यवंशी, विनोद शेंडे, विलास भाऊ कापसे, दीपक झगडे, सागर कपाट, मयूर भोयर, मोरेश्वर तराळे, संकेत पाटील, अरविंद मेंडुले, अमोल निंबाळकर, यशवंत धनकसार, रिंकू कांबळे, हेमंत झगडे, भोला माकडे, सुमित दांडवे, सौरभ लांबट, राज गायकवाड, साहिल लांडे, श्रेयस गावंडे, अंकित बावणे, वेदांत लांबट, कार्तिक लांडे, सोनू पुरी, यांनी अथक परिश्रम घेत सामन्याचे उत्कृष्ट आयोजन केलं. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन सुरज कांबळे यांनी केले.