नागपूर:राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी ७ वाजतापासून सुरुवात झाली आहे.नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानकेंद्रावर पोहोचले, नेहमीप्रमाणे त्यांनी सकाळी ७ वाजता मतदानाचा हक्क बजावला.
सर्व नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजवावा, असे मोहन भागवत यांनी म्हटलं आहे नागपूर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सहा मतदारसंघ शहराच्या सीमेत आहेत तर सहा ग्रामीण भागात आहेत.
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४५ लाख २५ हजार ९९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शहरातील संघ मुख्यालयाजवळ असलेल्या भाऊजी दप्तरी शाळेतील मतदान केंद्रात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मतदान केले.
यावेळी त्यांच्यासोबत माजी सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी देखील मतदान केले. शतप्रतिशत मतदानाचा आग्रह डॉ. मोहन भागवत नेहमी धरतात. त्यामुळं त्यांनीही घड्याळात सातचा ठोका पडताच थेट मतदान केंद्र गाठले.आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचं पालन केले