नागपूर: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 187 व्या जयंती निमित्त मनपा महिला व बालकल्याण समितीतर्फे वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा, गांधीनगर येथे मनपा शाळेतील 10 झोन मधील उत्कृष्ट दहा शिक्षिकांचा सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार होत्या. प्रामुख्याने मनपाच्या महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, श्रद्धा पाठक, साक्षी राऊत, वैशाली नारनवरे आदींची उपस्थिती होती. यांच्यासह वंदना शर्मा, संगीता अग्रवाल, श्वेता निगम, मीरा कुल्लर, निर्धारच्या कांता ढेपे, सुनंदा सोनवले, जया पानतावणे यांची उपस्थीती होती.
कार्यक्रमात मनपाच्या दहा प्रत्येक झोनमधील एका शिक्षिकेचा सत्कार कऱण्यात आला. तसेच वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनींना शालेय साहित्याचे वितरण कऱण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा ठाकरे यांनी केले. संचालन घिमे मॅडम यांनी तर आभार परिहार मॅडम यांनी मानले.
सत्कार करण्यात आलेल्या शिक्षिकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळेच्या वंदना दांडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळेच्या सुरेखा सावरबांधे, संजयनगर माध्यमिक शाळेच्या ज्योती काकडे, कपीलनगर माध्यमिक शाळेच्या पंचलता नागदिवे, हाजी अब्दुललीडर शाळेच्या रुख्मा कौसर, एम.के.आझाद माध्यमिक शाळेच्या शाहीन अख्तर, वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळेच्या रंजनी परिघर, नेताजी मार्केट प्राथमिक शाळेच्या शारदा मिश्रा, एकात्मता प्राथमिक शाळेच्या रोशनी जंजाल, जी.एम. बनायितवाला शाळेच्या रजिया शाहीन, मनपा शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोपटे देऊन देऊन सत्कार कऱण्यात आला.