नागपूर : Saturday Club Global Trust (SCGT) नागपूर चॅप्टरच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ७ महिलांचा सत्कार करण्यात आला.
शनिवारी चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या सोहळ्यात आदित्य अनघा बँकेच्या अध्यक्ष अनघा सराफ, क्रीम्स हॉस्पिटलच्या संचालिका केतकी अरबट, पॅरेंटिंग कौन्सेलर मेधा मुजुमदार, ऍथलेट आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रभा भैया, देहात फाउंडेशनच्या संस्थापक वृंदन बावनकर – घाटगे, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुद्धे आणि अंकशास्त्रज्ञ सायली देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला SCGT नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष बागेश महाजन, सचिव अमित बोरकर, कोषाध्यक्ष शरद अरसडे तसेच क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सत्कारमूर्तींनी आपल्या क्षेत्रातील अनुभव कथन करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन श्वेता सहस्रभोजनी यांनी केले, तर आभार प्रदर्शन चैताली बांगरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.