Advertisement
मुंबई : महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी रामचंद्र नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६० वर्षाचे होते. हरी नरके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
नरके यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना सर्व स्तरावरून व्यक्त होत आहे. याच आठवड्यात हरी नरके यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते.