एनआयएची माहिती, नागपूर स्थानकावर चोख व्यवस्था
नागपूर : मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. त्यानुसार लोहमार्ग पोलिस, आरपीएफ, बीडीडीएस आणि श्वाथ पथकाव्दारे रेल्वे गाड्यांची झाडाझडती घेतली जात आहे. शिवाय रेल्वे स्थानकाच्या कानाकोपºयावर लक्ष ठेवून आहेत. बॅगेज स्कॅनिंगमधून तपासणी केल्यानंतरच प्रवाशांना स्टेशनच्या आत प्रवेश दिला जात आहे. संशय येताच तपासणी केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) देशभरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सनासुदीच्या दिवसात देशभरात १२ ठिकाणी बॉम्ब पेरण्यात येणार असल्याचीही माहिती एनआयएला मिळाली असल्याने नागपुरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे.
नागपूर रेल्वेस्थानक देशाच्या हृदयस्थानी आहे. संवेदनशील रेल्वे स्थानकाच्या यादीत नागपूर रेल्वे स्थानकाचा समावेश होता. नागपुरातून दररोज १२५ पेक्षा अधिक प्रवासी गाड्या धावतात तर ४० हजार प्रवाशांची नियमीत वर्दळ असते. यापुर्वी नागपूर रेल्वे स्थानकावर घातपात करण्याचा ईशारा मिळाला होता. त्यामुळे नागपूर स्थानकावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला देशात १२ ठिकाणी बॉम्ब पेरण्यात येणार असल्याची सूचना मिळाली आहे. शनिवारी मिळालेल्या सूचनेनंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून देशभरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार आरपीएफने नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाºया रेल्वेगाड्यांची तपासणी सुरु केली आहे. रेल्वेगाडी अ येताच आरपीएफ जवान प्रत्येक डब्यात जाऊन तपासणी करीत आहेत. दिल्ली आणि हावड्याकडून येणाºया गाड्यांवर विशेष नजर आहे.
श्वानपथकाच्या मदतीने संशय आलेल्या प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. रविवारी रात्रीही आरपीएफने २० रेल्वेगाड्यांची तपासणी केली. सोमवारी दिवसभर आणि रात्री तपासणी सुरुच होती. लोहमार्ग पोलिसांकडूनही रेल्वेगाड्यांमध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने संशयीतांची तपासणी करण्यात येत आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत ही तपासणी सुरुच राहणार असल्याची माहिती आरपीएफच्या अधिकाºयांनी दिली.
सीसीटीव्हीद्वारे ‘वॉच
अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरॅव्दारे रेल्वेस्थानकाच्या कानाकोपºयावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील आरपीएफ जवानांनाही रेल्वेस्थानकावरील प्रत्येक हालचालीची बारकाईने पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बंदोबस्त आणि पेट्रोलिंग वाढविली
‘सुरक्षेच्या दृष्टीकोणातून रेल्वेगाड्यात लोहमार्ग पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने संशयीतांची तपासणी करण्यात येत आहे.’
-विश्व पानसरे, लोहमार्ग पोलीस अधिक्षक