नागपूर:शहरात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून टवाळखोरांच्या जमावाने पेट्रोल पंप चालक आणि एका महिलेशी धक्काबुक्की आणि गैरवर्तन केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. विकास बोरकर, राजेश मिश्रा आणि पंकज नावाच्या व्यक्तील पोलिसांनी विरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.
‘नागपूर टुडे’ने पिडीत महिलेशी यासंदर्भात भाष्य केले असता महिलेने आरोपींच्या कृत्यसंदर्भात सांगितले. या घटनेचा मुख्य आरोपी राजेश मिश्रा असल्याचे ती म्हणाली. एका भटक्या कुत्र्याला त्रास देण्यावरून महिलेचा विकास बोरकरशी नावाच्या व्यक्तीशी वाद झाला, त्यानंतर माझ्याशी गैरवर्तन केले. ही घटना बुधवारी रात्री घडली. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर विकास त्याच्या काही मित्रांसह परत आला आणि महिलेला नाक रगडून माफी मागण्यास भाग पाडले. पीडित महिलेने सांगितले की बोरकरशी वाद झाल्यानंर सात ते आठ जण पेट्रोल पंपावर आले आणि त्यांनी मला माफी मागायला लावली. त्यानंतर माझा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. मी एकाचा मोबाईल धरुन ठेवला होता. एका मुलाच्या फोनवरून मी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामुळे मला त्यांना गुंतवून ठेवायचे होते. त्यामुळे मी एकाचा मोबाईल हिसकावून घेतला. तोपर्यंत पोलिसही घटनास्थळी दाखल झाल्याचे ती म्हणाली.